दुहेरी नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाण वाढले असून भारतीय एकात्मतेच्या दृष्टीकोनातून ते गैर आहे.
येथे असलेले पोर्तुगीज वकीलातीचे कार्यालय ताबडतोब हलवून ते दिल्लीला स्थापन करण्याची मागणी ढवळीकर यांनी केली.
या कार्यालयाच्या मदतीने अनेक गोमंतकीय पोर्तुगालला रवाना होत आहेत. घटनेनुसार दुहेरी नागरिकत्व स्वीकारणे गुन्हा असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने या प्रकाराची गंभीरपणे दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.