Home बातम्या मराठी राजभाषा होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार

मराठी राजभाषा होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार

0
 त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही, तर चाळीसह मतदारसंघात भाजपाच्या विरोधात उमेदवार उभे केले जातील आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले जाईल असा इशारा म्हापसा येथे आयोजित एकदिवशीय लक्षणिक उपोषणावेळी बोलताना उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ मराठी कार्यकर्ते यांनी दिला.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विश्वास देसाई म्हणाले की, पोर्तुगीज काळातही मराठी भाषा टिकून राहिली.

कारण ती आमचा आत्मा आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व कॉंग्रेसपक्षाने मराठीच्या विषयावर गोमंतकीयांना झुलवत ठेवले. भाजपाने निवडणूकीत अभिवचन दिले. जनतेने त्यांच्यावर विश्‍वास ठेवून स्पष्ट बहुमत दिले खरे परंतु त्या बहुमताचा अनादर करून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मराठीचा प्रश्‍न संपल्याचे सांगून विषय संपविला. हा गोमंतकीयांचा विश्वास घात आहे, असे ते म्हणाले.  भाजपाने मराठीला राजभाषा करण्याचे आश्‍वासन गेल्या निवडणुकीत दिले. मंदिरात विष्णू वाघांनी गार्‍हाणी घातली आणि भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. मगोचे दोनचे तीन आमदार झाले. जनतेला मराठीचा विजय झाल्यासारखे वाटले होते. परंतु विद्यमान नेतृत्व मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मराठी राज्यभाषा आंदोलन समितीचे प्रमुख प्रदीप घाडी आमोणकर म्हणाले की, बहुजन समाजाला दावणीला बांधून गोव्यातील राजकीय पक्ष राज्य करीत आहेत. बहुजन समाजाला मराठीचे महत्व आहे. त्याऐवजी दोन टक्के लोकांच्या मनातली कोकणीच आज बहुसंख्यांकांवर लादली जात आहे. हा अन्याय कदापी सहन करणार नाही.
किशोर कोलगे, माजी नगरसेविका शुभांगी वायंगणकर यांचीही यावेळी भाषणे झाली.
लाक्षणिक उपोषणाला प्रदीप घाडी आमोणकर, एकनाथ म्हापसेकर, स्वा. सै. विश्‍वास देसाई, प्रभाकर येंडे, कॅजिटन परेरा, माजी आमदार विनायक नाईक, एकनाथ सटवाणी, श्रीकांत सिमेपुरुषकर, रणजीत राणे, माधव सटवाणी, मोहन कामत, गो. रा. ढवळीकर, उत्तम कोटकर, शशिकांत सरदेसाई, प्रकाश धुमाळ, किशोर कोलगे, नारायण राठवड, अनिल लाड, मोहन नाईक, शांताराम रेडकर, रंगनाथ वेळूस्कर, सौ. रोशनी घाडी आमोणकर, मिताली गडेकर, मीना गडेकर, शुभांगी वायंगणकर, हेमंत दिवकर, तुषार टोपले, प्रेमानंद दिवकर, गिरीष मांद्रेकर, राजू तेली. ऍड. भालचंद्र मयेकर, ऍड. अजितसिंह राणे, सचिन किटलेकर, विजय भिके, नरेंद्र आजगांवकर, सुदेश आर्लेकर, अशोक घाडी, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, रामकृष्ण डांगी, रमेश नाईक, मधुसुदन देसाई, पुंडलिक पळ, दामोदर दाभोळकर, उपेंद्र गांवकर, आनंद सावंत, बाळू वारंग, आनंद शिरगांवकर, दामू नाईक, विनायक गोवेकर, सुरेंद्र शेट्ये, श्रीपाद येंडे, दयानंद मांद्रेकर, कमलाकर हुम्रस्कर, उमेश झर्मेकर, विठ्ठल भगत, विनायक गोवेकर, दिनेश हळर्णकर, पांडुरंग कलघटगी, शामसुंदर फडते, प्रकाश गडेकर, संदीप चिमुलकर, भाई पंडीत, दिलीप शेर्लेकर, स्वा. सै. श्याम सिरसाट, रेणुका महाबळेश्‍वर च्यारी, सुनिल परब, संतोष मडकईकर, सुरेश तुळस्कर, कमलाकांत नाईक व इतर मिळून सुमारे २०० हून अधिक मराठी कार्यकर्ते आजच्या या लाक्षणिक उपोषणाला उपस्थित होते.