Home बातम्या पैंगीण अंगणवाडीत कुकरचा स्फोट

पैंगीण अंगणवाडीत कुकरचा स्फोट

0

जखमी बालकांमध्ये प्रतीक्षा वेळीप, विशाखा दीपक पागी, निषाद चंद्रकांत पागी, अस्मिका राजेंद्र वेळीप, बाबू विजयकुमार वेळीप आणि यश शिवप्रसाद वेळीप यांचा समावेश असून सर्व बालकांवर काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर घरी पाठविण्यात आले. कुकर गॅसवर ठेवल्या वेळी खाली पडला व त्याचा स्फोट झाला. त्यावेळी अंगणवाडीतील बालके खेळत होती. अंगणवाडी इमारतीमधील दोन खोल्यांपैकी एकाच खोलीत अंगणवाडी चालते.

त्याच खोलीत अन्य अंगणवाड्यांमध्ये पुरवठा करणारे तांदूळ, कडधान्याच्या पोत्या साठवून ठेवल्या असून ही जागा अपुरी पडते म्हणून शेजारी असलेल्या शासकीय प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये अंगणवाडी हलवावी अशा वारंवार केलेल्या सूचना काणकोणच्या सीडीपीओ कार्यालयातून लक्षात घेत नसल्याचा आरोप या भागातील एक पालक विजयकुमार प्रभू यांनी केला आहे.

सदर अंगणवाडीतील सेविका अत्यंत प्रामाणिकपणाने आणि काळजीपूर्वक बालकांना हाताळित असते मात्र सीडीपीओ कार्यालयातून हवे तेवढे सहकार्य देण्यात येत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. कुकरचा स्फोट झाला त्यावेळी मुले त्याच ठिकाणी खेळत होती. अपुर्‍या जागेचा हा परिणाम असल्याची तक्रार काणकोणच्या पोलीस स्थानकावर पालकांनी केली आहे.