Home बातम्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ४ ऐवजी ६ मार्चला

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ४ ऐवजी ६ मार्चला

0

दि. ४ फेब्रुवारी रोजी महम्मद पैगंबर यांचा वाढदिवस ‘बरावफत’ असल्याने त्यादिवशी निवडणुका ठेऊ नयेत अशी मागणी उत्तर प्रदेशमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे मतदानाच्या तारखेत फेरबदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. एकूण सात टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत आहेत.

निवडणूक आयोगाकडून २० निरीक्षकांची नियुक्ती

येत्या ३ मार्च रोजी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने २० निरीक्षकांची नियुक्ती केलेली असून त्यात १८ महिला व २ पुरुष निरीक्षकांचा समावेश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ४० मतदारसंघांसाठी हे २० निरीक्षक असून त्यापैकी ११ निरीक्षक हे उत्तर गोव्यातील मतदारसंघांसाठी तर ९ निरीक्षक हे दक्षिण गोव्यातील मतदारसंघांसाठी असतील, असे त्यानी स्पष्ट केले.

राज्यभरात १६१२ मतदान केंद्रे असून त्यापैकी ९४६ मतदान केंद्रे ही उत्तर गोव्यात तर ६६६ मतदान केंद्रे ही दक्षिण गोव्यात असल्याचे ते म्हणाले. उत्तर गोव्यातील ९४६ मतदान केंद्रांपैकी १६३ ही शहरी भागात तर ७८३ मतदान केंद्रे ही ग्रामीण भागात आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी ४१५ मतदान केंद्रे ही शहरी भागांत तर ११९७ मतदान केंद्रे ही ग्रामीण भागांत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ ठेवणारे निरीक्षक व कार्यकारी निरीक्षक यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याचेही राज्य निवडणूक आयोगाने काल स्पष्ट केले.

दरम्यान, मतदारसंघांसाठी आयोगाच्या भरारी पथकांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून या पथकाचे प्रमुख हे ज्येष्ठ कार्यकारी दंडाधिकारी असतील. तसेच पथकात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, एक व्हिडिओग्राफर व ३ ते ४ सशस्त्र पोलीस असतील, असे आयोगाने स्पष्ट केले.