Home बातम्या पु.लं. च्या घरात चोरी

पु.लं. च्या घरात चोरी

0

विख्यात दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे पुण्यातील घर चोरट्यांनी काल फोडले. मात्र, चोरट्यांना या बंद घरात पुस्तकांखेरीज दुसरे काहीही न सापडल्याने काहीही न घेता त्यांनी पलायन केले. मात्र, या चोरीमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटे ही चोरीची घटना घडली.

पु. लं. चे नातलग अश्विन सुधीर लोकरे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पुण्यातील भांडारकर रोडवर मालतीमाधव अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर पु. लं. चा हा फ्लॅट आहे. या चोरीप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलीस तपास करीत आहेत.