Home बातम्या पुस्तक संस्कृती वाढतच जाईल

पुस्तक संस्कृती वाढतच जाईल

0

सभापती आर्लेकर यांना विश्‍वास; ऑथर्स गिल्डच्या परिषदेचा समारोप

इलेक्ट्रॉनिक माध्यमे प्रभावी बनत चालल्याने पुस्तक संस्कृतीबाबत अनेकांनी धसका घेतला आह, असे असले तरी येणार्‍या काळात पुस्तक संस्कृती वाढतच जाईल, असा विश्‍वास सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केला. गोवा विद्यापीठात आयोजित केलेल्या ३७व्या ऑथर्स गिल्ड परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

हेरि पॉटरचे सिनेमे पाहणार्‍यांपेक्षा हेरि पॉटरची पुस्तक वाचणारे अधिक असल्याचे नमूद करून आर्लेकर म्हणाले, एकेकाळी टीव्ही आला तेव्हा सिनेमा कसा चालेल असा प्रश्‍न अनेकांना पडला होता मात्र तो काळाच्या ओघात बाजूला पडला.

साहित्य अकादमीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले पुंडलिक नायक म्हणाले, सिनेमा आले म्हणून नाटकांना गर्दीचे प्रमाण घटलेले नाही. पुस्तकांना पर्याय असून शकत नाही, त्यांची आपल्या मनावर-बुद्धीवर प्रभाव पाडण्याची तरा आगळी असल्याचे ते म्हणाले. मात्र पुस्तक संस्कृतीकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे लागेल असे ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर म्हणाले, पुस्तकांचा प्रचार वाढला पाहिजे. मुलांंना वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी मुलांसमोर गोष्टींची पुस्तके वाचावीत.

ऑथर्स गिल्डचे सरचिटणीस डॉ. एस. एस. अवस्थी यांनी स्वागत केले. केंद्र सरकारने आपले पुस्तक धोरण आखावे अशी मागणी त्यांनी केली. ऑथर्स गिल्डच्या गोवा विभागाचे निमंत्रक मोहनदास सुर्लकर यांनी गोव्यात पुस्तक संस्कृतीच्या प्रसारासाठी काम करणार असल्याचे सांगितले. ऑथर्स गिल्डचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कुमार यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक घरात एक पुस्तकांचे दालन असावे आणि वसंत पंचमी राष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणून साजरा व्हावा.