Home बातम्या म्यानमारच्या निवडणुकीत स्यू की यांचा विजय

म्यानमारच्या निवडणुकीत स्यू की यांचा विजय

0

लोकशाहीवाद्यांचा जल्लोष

लष्करी राजवट असलेल्या म्यानमारच्या काल झालेल्या पोटनिवडणुकीत तेथे गेली अनेक वर्षे लोकशाहीसाठी लढा देणार्‍या व नोव्हेंबर २०१०मध्ये नजरकैदेतून मुक्त करण्यात आलेल्या आँग सान स्यू की (६६) निवडून आल्या आहे. लोकशाहीवाद्यांकडून हा शुभसंकेत मानला जात आहे. दरम्यान, म्यानमारच्या या निवडणुका घेण्यासाठी अमेरिका, भारत, ऑस्टेलिया तसेच युरोपीय राष्ट्रांमधील निरीक्षकांच्या उपस्थितीत या निवडणुका झाल्या. आपल्याच लष्कराविरुद्धची लढाई म्यानमारच्या लोकशाहीवादी जनतेने स्यू की यांच्या नेतृत्त्वाखाली सुरूच ठेवली.

नोव्हेंबर २०१० मध्ये नजरकैदेतून मुक्त झाल्यानंतर स्यू की यांनी पुन्हा एकदा लोकशाहीची लढाई तीव्र केली होती. याचाच परिणाम म्हणून देशात गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. पण यातही लष्कराचा हस्तक्षेप कायम राहिला आणि लष्करानेच उभ्या केलेले नेते वरचढ राहिले. आता होत असलेल्या पोटनिवडणाकांमध्येही असेच होईल , असे सांगितले जात होते. पण जनतेने खंबीरपणे स्यू की यांनी पाठिंबा दिल्याची चिन्हे दिसत असून , हे म्यानमारमधील लोकशाहीच्या दिशेने नवे पाऊल असल्याची प्रतिक्रिया स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून उमटत आहे.