जून महिन्यात येरवडा कारागृहात कातील सिद्दीकी या मुजाहिदीन दहशतवाद्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पुण्यास स्फोट घडवून आणले होते, अशी कबुली या दहशतवाद्यांनी दिली आहे.
सुरुवातीस हे स्फोट मुंबईत वा खुद्द कारागृहात घडवण्याची योजना होती मात्र साधनसामग्रीच्या अभावामुळे योजना बदलण्यात आली.
असद खान (३३), इम्रान खान (३१) यांना दक्षिण दिल्लीतून व सईद फिरोज (३८) याला दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आले. दहशतवादी संघटनेत हे सर्व महत्त्वांच्या जबाबदार्या पार पाडत होते अशी माहिती समोर आली आहे. असद खान हा संगणक तज्ज्ञ आहे. या सर्वांना रियाज व इक्बाल भटकळ यांच्याकडून सूचना मिळत होत्या.
दरम्यान, अटक केलेल्या या तिघांकडून पाच किलो स्फोटके, दहा डिटोनेटर्स व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.