Home बातम्या पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू व उदासीन केंद्र सरकार

पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू व उदासीन केंद्र सरकार

0

– भास्कर वासुदेव जोशी, कारापूर – तिस्क, साखळी.

पाकिस्तानमधील २७ कुटुंबे भारतात तीर्थयात्रेसाठी आली आहेत. त्यापैकी १४० सदस्यांनी आपल्याला भारतात राहू द्यावे अशी विनंती केंद्र सरकारला केली होती. मात्र, त्यांची ही विनंती ङ्गेटाळणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्‍नावरील उत्तरात सांगितले. आता यावर त्यात काय चूक आहे, असे वर वर विचार करता वाटेल. परंतु त्यांना पाकमधून भारतात का येऊन रहावे असे वाटले याचा विचार केला, तर त्याचे उत्तर मिळते.

पाकमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळत नाहीत. सतत त्यांना जिहादींच्या दडपणाखाली वावरावे लागते. त्यांची बायका-मुले सुरक्षित राहतील का, असा प्रश्‍न त्यांना सतत भेडसावत असतो. त्यामुळेच त्यांनी भारत सरकारला विनंती केली होती की, पाकमध्ये होत असलेल्या अन्यायामुळे आम्हाला तिथे राहणे अशक्य झाले आहे. भारतात राहू दिले तर आमच्या मुलांना सुरक्षित जीवन जगता येईल. त्यासाठी हवे ते कष्ट करण्याची आमची तयारी आहे, पण आम्हाला भारतातच राहू द्या! अनेक स्वयंसेवी संस्थांनी पाकमधून आलेल्या हिंदूंना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतात राहण्याची अनुमती मिळावी म्हणून केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. मात्र केंद्रातील कॉंग्रेस शासनाने या सगळ्या मागण्या ङ्गेटाळून लावल्या आहेत.

ज्यावेळी बांगलादेशातून कोट्यवधी घुसखोर आपल्या देशात येऊन येथे बिनदिक्कतपणे राहतात, त्यांना त्यांच्या देशात जायला सांगा असे सांगितले गेले तेव्हा केंद्रातील एक मंत्री ङ्गअतिथी देवो भवफ ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे त्यांना बांगलादेशात जा म्हणून कसे सांगणार, असे उत्तर देतात. म्हणजे घुसखोरी करून भारतात राहिले तर चालते, परंतु कायदेशीर मार्गाने कोणी येथे राहण्याची परवानगी मागत असेल तर ते चालत नाही.

याला दुसराही एक पैलू आहे, पाकमधून आलेले हिंदू आहेत, घुसखोरी करून बांगलादेशातून आलेले अल्पसंख्यक आहेत. खरी मेख आहे ती इथेच आहे. या कोट्यवधी घुसखोरांना येथे राहण्यास जागा मिळते, शिधापत्र मिळते, निवासी दाखला मिळतो, निवडणूक ओळखपत्र आणि इतर अन्य ओळखपत्रेही सहजपणे मिळतात. हे कसे आणि कशासाठी होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ती कॉंग्रेस सरकारची मतपेढी आहे.

आज आसाममध्ये बांगलादेशातून आलेले घुसखोर नगरसेवक तर आहेतच, शिवाय आमदारही झालेले आहेत. बरे, ही पाकमधून भारतात आलेली माणसे आतंकवादी आहेत का? तसेही नाही! मात्र बांगलादेशातून आलेले घुसखोर अनेक गुन्हेगारी आणि भारतविरोधी कारवायांत अग्रेसर आहेत. असे गुन्हेगारी करणारे, आतंकवादी कृत्ये करणारे भारतात राहिले तर चालतात, परंतु सरळमार्गी चालत नाहीत.

व्हिसाची मुदत संपताच या माणसांना मायदेशी म्हणजे पाकिस्तानात जाण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आज भारतात पाकमधून वा बांगला देशातून आलेले व्हिसाची मुदत संपल्यानंतरही सुखाने राहात आहेत. त्यांना शोधून काढून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्याची कारवाई केली जात नाही, कारण काय?

जी कुटुंबे भारतात राहण्याची परवानगी मागत आहेत, त्यांची घरे, जमीनजुमला, इतर मालमत्ता, नोकरी-धंदा हे सर्व असताना त्या सर्वांवर पाणी सोडून ते भारतात राहू इच्छितात याचाच अर्थ त्यांना तिथे सुख मिळत नाही. सुरक्षित वाटत नाही. तेथील स्थिरस्थावर असलेले जीवन सोडून भारतात राहण्यासाठी काबाडकष्ट करण्याची त्यांची तयारी आहे, याचा अर्थ काय होतो?

कोण असे आपले स्थिरस्थावर असलेले जीवन सोडून दुसर्‍या ठिकाणी कष्ट करून जगण्याची धडपड करेल? उत्तर सरळ आहे, ते म्हणजे सुरक्षितता! आपल्या बायका-मुलींची सुरक्षितता!! इकडे काश्मिरमधूनही हिंदू कुटुंबे उर्वरित भारतात आली आहेत. त्यांनाही काश्मीरमधून हुसकावून लावण्यात आले आहे. त्यांच्या जमिनींवर, घरांवर, बंगल्यांवर ताबा मिळवला. तेथील जिहादी त्यांच्या जमिनीचे मालक बनले, आणि खरे मालक रस्त्यावर आले. काश्मीरमधून आलेले हिंदू पंडित संडास साङ्ग करण्याचे काम करू लागले. तंबूत राहू लागले. त्यांची दखल घेण्याची तसदी कोणीच घेतली नाही. त्यांना मानवाधिकार नाहीत?

अशाही स्थितीत त्यांना काश्मिरमध्ये परत जा असे कोणी सांगितले तरीही त्यांची तयारी नाही. कारण इथे काबाडकष्ट करावे लागले, संडास साङ्ग करून उदरनिर्वाह करावा लागला तरी इथे सुरक्षितता आहे. बायका-मुलींची अब्रु सुरक्षित राहील, याची त्यांना खात्री वाटते. दुःख एकच वाटते, आपल्याच देशातील नागरिकांना आपल्याच देशातील एका भागात असुरक्षित वाटून आपली मालमत्ता, संपत्ती व घरदार सोडून परगंदा व्हावे लागले, आणि आपले सरकार यासाठी काही करीत नाही. आणि करणारही नाही. याचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्‍न विचारून शोधावे. उत्तर नक्कीच मिळेल आणि ते बरोबरच मिळेल.