पणजी व परिसरातील रस्त्यांवर वेगमर्यादा

0
5

गोवा सरकारने पणजी आणि परिसरातील 21 वेगवेगळ्या रस्त्यांसाठी वेग मर्यादा अधिसूचित केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर मेरशी सर्कल ते ओल्ड गोवा, शिरदाव, आगशी रस्त्यावर वेगमर्यादा ताशी 70 कि.मी. आहे. पणजीतील डीबीबी मार्ग वगळता इतर सर्व रस्त्यांसाठी वेगमर्यादा ताशी 40 कि.मी. आहे.

राष्ट्रीय महामार्ग 4 वरील बाणस्तारी, राष्ट्रीय महामार्ग 17 वरील सिरदाव, जुन्या आणि नवीन मांडवी पुलावर वेग मर्यादा 40 कि.मी. तसेच, झुआरी पुलासाठी ताशी 30 किमीची मर्यादा आहे.

राष्ट्रीय महामार्ग 4-एवरील दिवजा सर्कल ते दर्गा जंक्शन-ओल्ड गोवा मार्गावर वेग मर्यादा ताशी 40 कि.मी., हात कात्रो खांब-ओल्ड गोवा ते बाणस्तारी पूल (धुळापी बाजू) मार्गावर ताशी 40, मेरशी सर्कल ते हात कात्रो खांब मार्गावर ताशी 70 कि.मी. एवढी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.17 वर केटीसी सर्कल- पणजी ते शिरदोण झुवारी पूल (आगशी बाजू) मार्गावर दुचाकी आणि माल वाहतूक वाहनांसाठी 60, चारचाकी वाहनांसाठी ताशी 70 कि.मी एवढी आहे.

मिरामार सर्कल ते विज्ञान केंद्र जंक्शन, जुना पाटो पूल ते चार खांब जंक्शन, राजभवन रस्ता, मिरामार सर्कल ते दोनापावल जंक्शन, पिलार जंक्शन ते हात कात्रो खांब (व्हाया -नेवरा) या मार्गावर वाहनांसाठी गती प्रति तास 40 कि.मी. ठेवण्यात आली आहे.