प्रसिद्ध नाटककार श्री. गो. पु. देशपांडे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते प्राध्यापक होते. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘चाणक्य’, ‘अंधारयात्रा’, ‘सत्यशोधक’, ‘अंतिम दिवस’ ही त्यांची नाटके गाजली होती.
ते भारत – चीन संबंधांचे व चिनी भाषेचे एक जाणकारही होते.