Home बातम्या दाबोळीत बंगल्यात चोरी

दाबोळीत बंगल्यात चोरी

0

दाबोळी येथे राहणारे रघुनाथ खोब्रेकर यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २२ हजार रु.चा ऐवज लंपास केल्याची तक्रार वास्को पोलीस स्थानकात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोब्रेकर व त्यांच्या पत्नी बुधवारी सकाळी ९ वा.च्या सुमारास बंगला बंद करून नोकरीसाठी शहरात आल्या होत्या. संध्याकाळी ६ वा. सुमारास दोघेही घरी परतल्यावर चोरट्यांनी दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. घरात गेल्यावर चोरट्यांनी मागील दरवाजातून आत प्रवेश केल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक तपासाअंती चोरट्यांनी कपाट फोडून आतील चांदीचा नेकलेस, मनगटी घड्याळ व भ्रमणध्वनी संच पळविल्याचे उघडकीस आले. रात्री उशीरापर्यंत वास्को पोलीस पंचनामा करीत होते.