Home बातम्या मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी फरारींची छायाचित्रे जारी

मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी फरारींची छायाचित्रे जारी

0

नोव्हेंबर २००९ मधील मडगाव येथील बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने तिघा फरारी आरोपींची छायाचित्रे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून त्यांच्याविषयी माहिती असलेल्यांनी ८२८५१००१०० या दूरध्वनी क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. रूद्र पाटील, प्रवीण लिमकर व जयप्रकाश ऊर्फ अण्णा अशी या आरोपींची नावे आहेत.

मडगाव स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने एकूण आठजणांविरुद्ध आरोपपत्र ठेवले असून त्यापैकी मलगोंडा पाटील व योगेश नाईक हे स्फोटात ठार झाले होते. इतर चौघेजण फरारी आहेत.