Home बातम्या तोतया पोलिसांनी महिलेचे दागिने लुटले

तोतया पोलिसांनी महिलेचे दागिने लुटले

0

तोतया पोलीस बनून महिलांना लुटण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने सर्वत्र असुरक्षितता निर्माण झाली आहे. काल मालभाट येथील मशिदीजवळून सईदा सैयद (६५) ही वृद्ध महिला जात असता खाकी वेशधारी व सुरक्षा वेश परिधान केलेल्या दोघा तरुणांनी तिला अडवून १.५० लाख रुपयांचे दागिने पळविले. त्या दोघांनी तिला अडवून पुढे खून झालेला असून दागिने घालून त्या बाजूने न जाण्यास सांगितले. त्यावर दागिने घालण्याचा व खुनाचा संबंध काय असा तिने प्रतिप्रश्‍न करताच, दागिन्यामुळे खून झाल्याचे सांगितले.

तिने अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न करताच बॅगेत घालण्याचा सल्ला दिला व मदत करण्याच्या बहाण्याने रस्त्यावरील पेपर काढून त्यात दागिने बांधल्याचे भासवून बॅगेत घातले. ती गेल्यानंतर हे दोघे फरारी झाले. घरी जाऊन तिने पाहिले असता ते दागिने बनावट निघाले. दोन बांगड्या व एक सोनसाखळी पळविली.

दहा दिसांपूर्वी रेल्वे उड्डाण पुलावर एका महिलेला अडवून दोन लाख रु. दागिने पळविले तर राय येथे एका व्यापार्‍याला अडवून ६५ हजार रुपये रोख पळविले होते.

या दिवसांत नावेली व बाणावली येथे पहाटे चर्चमध्ये प्रार्थनेला जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या. तीन घटना घडूनही पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यात यश आलेले नाही.