Home बातम्या अपह्रत पर्यटकांचा अद्याप शोध नाही

अपह्रत पर्यटकांचा अद्याप शोध नाही

0

माओवाद्यांनी अपहरण केलेल्या इटलीच्या दोन नागरिकांचा अद्याप पत्ता लागलेला नसून माओवाद्यांनी काल आपल्या प्रस्तावावरील चर्चेसाठी तिघांची नावे सुचविली आहेत.

ओरिसा पोलीसांनी शोध तीव्र केला असला तरी त्या दोघांचा थांगपत्ता काल उशीरापर्यंत लागू शकला नव्हता. माओवाद्यांनी वितरित केलेल्या पत्रकांतील मागण्यांचा सरकार अभ्यास करीत असल्याचे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी विधानसभेत सांगितले.

बोस्को पावलो (५४) व क्लाऊडिओ कोलागेलो (६१) अशी या पर्यटकांची नावे असून पाच दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते ज्याबाबत शनिवारी कळले होते.