Home बातम्या तार-म्हापसा येथे अपघातात युवक ठार

तार-म्हापसा येथे अपघातात युवक ठार

0

म्हापसा येथील बस्तोडा तार जंक्शनवर काल पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहन चालकाने जीए ०३ क्यु ४२७५ या स्प्लेंडर हिरो होंडा मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीस्वार गौरेश सुरेश म्हामल (२७) गावसावाडा म्हापसा हा युवक रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.

मयत गौरेश म्हामल हा पर्वरीहून म्हपसा येथे येत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली व घटनास्थळावरून पलायन केले. म्हापसा पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला व गंभीर जखमी झालेल्या गौरेश म्हामल याला इस्पितळात उपचारासाठी नेले असता तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. म्हापसा पोलिसांनी मयत गौरेश म्हामल या युवकाचा मृतदेह आज त्यांच्या नातेवाईकांकडे दिला व या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहना विरुध्द म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार दयानंद साळगांवकर करीत आहेत.