टेम्पोच्या धडकेने गवंडाळी येथे पोलिसाचा जागीच मृत्यू

0
8

गवंडाळी जुने गोवा येथे काल सकाळी टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक पोलीस कर्मचारी प्रदीप परब यांचे निधन झाले. तर, त्यांची पत्नी माधुरी परब ह्या जखमी झाल्या आहेत.
पोलीस कर्मचारी प्रदीप परब हे सांतइस्तेव येथून पणजीला येत असताना गवंडळी पुलाच्यानजीक त्यांची दुचाकी आणि टेम्पो यांच्यात अपघात झाला. या दोन्ही वाहनांतील झालेल्या धडकेने दुचाकीवरून दोघेही फेकली गेली. तर, दुचाकी टेम्पोच्या चाकाखाली सापडली. प्रदीप यांच्या डोक्याला जबर जखम झाली. स्थानिक नागरिकांनी जखमींना जवळच्या खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी प्रदीप यांचे निधन झाल्याचे घोषित केले. जखमी माधुरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जुने गोवा पोलीस तपास करीत आहेत.