एका झगमगत्या दिमाखदार समारंभात जागतिक चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या ऑस्कर पुरस्कार २०१४ चे वितरण काल येथे झाले. उत्कृष्ट चित्रपटासाठीचा ऑस्कर पुरस्कार ‘टवेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. कोणत्याही गटवारीत भारताचे नामांकन नसले तरी उत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या केट ब्लँचेट हिने एका ठिकाणी भारताचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
उत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री यासाठीचे पुरस्कार अनुक्रमे मॅथ्यू मॅकनॉघे (डल्लास बायर्स क्लब) व केट ब्लँचेट (ब्ल्यू जस्मिन) यांना प्राप्त झाले आहेत. ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाचे दिग्दर्शक आफोन्सो कुआरॉन यांची उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवड झाली आहे. या कलावंतांनी रेड कार्पेटवरून आपापले पुरस्कार स्वीकारले.
अन्य पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणेः
सहायक अभिनेता – जेअर्ड लेटो (डल्लास बायर्स क्लब), सहायक अभिनेत्री – लुपिटा न्योंगो (१२ इयर्स अ स्लेव्ह), विदेशी भाषेतील चित्रपट – द ग्रेट ब्युटी (इटली), पटकथा (स्वीकृत) – १२ इयर्स अस्लेव्ह, मूळ पटकथा लेखन – फ्रोझन, ध्वनी मिश्रण – ‘ग्रॅव्हिटी’, वेशभूषा – द ग्रेट गॅटस्बाय, ऍनिमेटेड लघुपट – मि. हुबलॉट, बोधपट – व्टेंटी फीट फ्रॉम स्टारडम, सिनेमाटोग्राफी – ग्रॅव्हिटी, संगीत – ग्रॅव्हिटी.
उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना केट ब्लँचेट हिने ज्युडी डेंच हिचा उल्लेख करताना ज्युडी सध्या भारतात चित्रिकरणात व्यस्त असल्याचे सांगितले. देव पटेल व मॅगी स्मिथ यांच्यासह ‘द बेस्ट एकझोटिक मेरीगोल्ड हॉटेल’ चित्रपटात काम केले होते. व्यावसायिक दृष्ट्या हा चित्रपट यशस्वी ठरला होता.