>> सूचना व हरकतींसाठी मसुदा जाहीर
गोव्यातील पश्चिम घाटातील तब्बल १४६१ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र केंद्रीय पर्यावरण, वन व हवामाल बदल मंत्रालयाने जैवसंवेदनशील ठरवले असून, त्यासाठीची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. त्यात तीन तालुक्यातील तब्बल ९९ गावांचा समावेश असून, सूचना व हरकती नोंदवल्यानंतर अंतिमत: ही गावे जैवसंवेदनशील म्हणून जाहीर केली जाणार आहेत. सत्तरी तालुक्यातील ५६, सांगे तालुक्यातील ३८ आणि काणकोण तालुक्यातील ५ गावांचा समावेश जैवसंवेदनशील क्षेत्रात होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत गोव्यासह गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकळ, केरळ व तामिळनाडू या सहा राज्यांच्या पश्चिम घाटातील ५६,८२५ चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र हा जैवसंवेदनशील ठरवले आहे. हा मसुदा हरकती व सूचना नोंदवण्यासाठी सहाही राज्यांतील नागरिकांसाठी ६० दिवस खुला असेल.
ज्या कुणाला या मसुदा अधिसूचनेसंबंधी सूचना अथवा आक्षेप नोंदवायचा असेल, त्यांनी ६० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे सचिव, इंदिरा पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, जोर बाग मार्ग, अली गंज, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर अथवा शीू-ाशषऽपळल.ळप या ई-मेलवर पत्रव्यवहार करावा लागेल.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मसुदा अधिसूचनेत जैवसंवेदनशील ठरवण्यात आलेली गावे खालीलप्रमाणे आहेत. सत्तरी तालुक्यातील ५६ गावांचा समावेश असून, त्यात शिरोली, गुळे, बाईलवाडा, पाळी, अंजुणा, साळपी बुद्रुक, शिंगणे, नानेली, झमी, माळोली, कोपार्डे, बह्माकरमळी, हेदोडे, उस्ते, आंबेडे, डोंगरावाडा, मावशील, भुईपाल, वाळपई, सावर्डे, वेळगे, हासोळे, करंबळी बुर्झल, बाराजण, मानशे, शेळपी खुर्द, भिरोंडे, खेतोडे, शिर्सोदे, करंझोळ, आसोडे, मेळावली, गोटियाखाडीलवाडा, आंबेली, गावणे, मालपण, सुर्ला, साट्रे, गोआली, चरावडे, इव्रे खुर्द, इव्रे बुद्रुक, केळावडे, रिवे, कोडाळ, डोंगुरवाडा, देरोडे, वायंगणी, नानोडे, झरवी, पेनराल या गावांचा समावेश आहे.
काणकोणातील खोल, गावडोंगरी, खोतीगाव, पैंगीण व लोलये या पाच गावांचा समावेश आहे.
सांगेतील ३८ गावांचा समावेश असून, त्यात सुर्ल, आल्त, धारबांदोडा, संगोड, शिगाव, कामरखांड, रुब्रे, डुडाल, साळावली, कुर्डी, रिवणा, कोळंब, नांगिणी, दिगाळी, नुने, साकोर्डा, मोले, करंझोळ, कुळे, सोनावळी, भोमा, ओशेल, डोंगुर्ली, माळिंगे, पाटे, उगे, तुडोव, पोत्रे, विळये, डोंगर, नेत्रावळी, वेर्ले, भाटी, कुंबारी, सिगोणे, कोल या गावांचा समावेश आहे.