चावडी-काणकोण येथे रूबी रेसिडेन्सी इमारत कोसळणे हा अपघात असून तेथील असुरक्षित इमारती सरकारने पाडाव्या अशी मागणी काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे विजया पागी खून प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस गजाआड केल्याबद्दल पोलिसांचेही त्यांनी अभिनंदन केले.
बिल्डर्सला अद्याप का अटक होत नाही, या प्रश्नावर पत्रकारांनी त्यांना बरेच छेडले. रूबी रेसिडेन्सी इमारत कोसळणे हा अपघात असेल तर या प्रकरणातून सर्वजण सहिसलामात सुटू शकेल, असे पत्रकारांनी सांगितल्यानंतर नाईक गडबडले.