Home बातम्या ग्रामपंचायतींवर अनुसूचित जमातीस आरक्षण द्या

ग्रामपंचायतींवर अनुसूचित जमातीस आरक्षण द्या

0

डेमोक्रेटिक पीपल्स फेडरेशनची मागणी

ग्रामपंचायतींवर सगळ्यांना आरक्षण मिळत असतानाच अनुसूचित जातींना मात्र अजिबात आरक्षण मिळत नसून यावेळी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत ते दिले जावे, अशी मागणी काल ऑल गोवा डेमोक्रेटिक पीपल्स फेडरेशनने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष केरकर यावेळी बोलताना म्हणाले की, अनुसूचित जातीतील ५२ जणांची गोवाभरातील पंचायतींवर नियुक्ती पंच म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र, दीड हजार रु. मानधन सोडल्यास कोणतेही अधिकार या नियुक्त पंचांना नसतात. आमच्या समाजातील लोकांची अशा प्रकारे नियुक्ती न करता आम्हांला निवडणुकीत आरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे व ती पूर्ण न झाल्यास नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असे त्यानी स्पष्ट केले. गेल्या २० मार्च रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व पंचायतमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना आरक्षणासंबंधीच्यामागण्याचे निवेदन दिले असल्याची माहितीही त्यानी दिली. अनुसूचित जातींचा राज्यात विकास झालेला नसल्याने त्यांना किमान ७.५ टक्के एवढे आरक्षण पंचायत निवडणुकीत द्यावे, अशी मागणीही सुभाष केरकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.

तत्पूवीं पंचायत निवडणुकीच्या आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या बांधवांच्या बैठकीत सुभाष केरकर यांच्याबरोबरच गणेश पवार, कृष्णा चोपडेकर यांनीही मार्गदर्शन केले.