Home बातम्या गोवा वेल्हा येथील भव्य सभेत सूत्रधाराच्या अटकेची मागणी

गोवा वेल्हा येथील भव्य सभेत सूत्रधाराच्या अटकेची मागणी

0
काल संध्याकाळी गोवा वेल्हा येथील निषेध सभेत भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सतीश धोंड व किरण कांदोळकर यांनाच प्रामुख्याने व्यासपीठावरील नेत्यांनी लक्ष्य केले. माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, ऍड. अविनाश भोसले, जॉन व्हएगस, गोविंद गावडे आदिंचाही व्यासपीठावर समावेश होता. निषेध सभेचे आयोजन निमंत्रक सायमन कायादो यांनी केले होते.

वाघांवरील केलेला हा हल्ल्याचा भ्याडपणाच असून या प्रकरणांशी संबंधित असलेल्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पत्रकार तेजपालसाठी लावलेला तगादा या प्रकणात दिसून येत नाही. या प्रकरणाच्या प्रमुख सुत्रधाराला अटक न झाल्यास तमाम गोवा पेटून उठेल असाही इशारा व्यासपीठावर वक्त्यांनी दिला. आमदार विष्णू सुर्या वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री, सतीश धोंड, आमदार किरण कांदोळकर यांच्यावर हल्ल्यास जबाबदार असल्याचा आरोप केला.