परवा संध्याकाळपर्यंत फक्त ८४ अर्जांची छाननी पूर्ण झाली होती. एकाच बरोबर किमान हजार ते दीड हजार गृहिणींना महागाई भत्ता वितरित करण्याचे ठरविले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृह आधार योजनेचे पहिल्या टप्प्यातील अर्ज दिवाळी पूर्वी मंजूर करण्यास सांगितले होते. त्यामुळे खात्याच्या अधिकार्यांची धावपळ सुरू होती. खाण परिसरातील गृहिणींनी केलेल्या अर्जांना प्राधान्य देण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. दिवाळीला वरील योजनेखालील प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश मिळेल अशी अनेक गृहिणींची अपेक्षा होती.
पहिल्या टप्प्यात पंधरा हजार अर्ज निकालात काढण्याचे सरकारने ठरविले आहे.