मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेला दहशतवादी अबू हमजा याचा ताबा मुंबई पोलिसांनी मागितलेला असताना आता गुजरात पोलिसांनीही त्याचा ताबा मिळविण्यासाठी शुक्रवार दिल्ली कोर्टात अर्ज दाखल केला. हमजा सध्या दिल्ली पोलीसांच्या ताब्यात असून त्याचा रिमांड दि. २० रोजी संपणार आहे.
२००६मध्ये अहमदाबाद येथील कालूपूर रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट घडविण्यासाठी त्यानी माणसांची नेमणूक केली होती असा आरोप असून त्यासाठी चौकशीकरिता गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याचा ताबा मागितला आहे. या स्फोटात २५ माणसे मारली गेली होती.