29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

‘गाऊट’वर प्रभावी होमिओपॅथी (वातरक्त किंवा संधी रोग)

  • डॉ. आरती दिनकर
    (होमिओपॅथी तज्ज्ञ आणि समुपदेशक)

‘गाऊट’मधील रोगाचे मुख्य कारण म्हणजे रुग्णाच्या रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते. होमिओपॅथिक औषधांनी पेशंटच्या रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तीव्र वेदना कमी होऊन पेशंटला गुण येतो.

४२ वर्षीय उदय नावाचे गृहस्थ उजवा पाय जमिनीवर न टेकवता एका पायाने माझ्या क्लिनिकच्या केबिनमध्ये आले. बघितलं तर त्यांना अत्यंत वेदना होत होत्या हे लगेच लक्षात आले. पायावर सूज व त्या जागेवरची त्वचा लाल झाली होती. पायाच्या अंगठ्याच्या वर जास्तच दुखत होते, त्यांच्या सांध्याजवळील शिरा मोठा झालेल्या होत्या, सांध्यावर जेथे सूज आली होती तेथे दाबले असता खड्डा पडला. त्यांनी याआधी अनेक पेन-किलर्स (वेदनाशामक गोळ्या)घेतली होती. याने तात्पुरता गुण येऊन बरे वाटायचे… अशी दोन-अडीच वर्षे काढली. आता रोगाचे स्वरूप जुनाट झाल्यामुळे जास्तच त्रास होऊ लागला तेव्हा कुणीतरी सांगितले त्यानुसार ते आज माझ्याकडे होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी आले होते. मी त्यांना काही महत्त्वाचे व जुजबी प्रश्न विचारले. त्यांनी त्यांची रिपोर्टची फाईलही बरोबर आणली होती ती मी बघितली, त्यांना सध्या असलेल्या ‘गाऊट’ म्हणजेच ‘वातरक्त’ या रोगाच्या रोग लक्षणांवर मी होमिओपॅथीचे नेमके औषध दिले. काही दिवसातच त्यांना औषधाचा सुपरिणाम जाणवला व त्यांना बरे वाटले. ‘माझा विश्वासच बसत नाही की मला गाऊटच्या रोगा पासून मुक्तता मिळाली’, असे मला त्यांनी आवर्जून सांगितले.
पेशंटच्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे पेशंटला लहान सांध्यात तीव्र वेदना होतात. तोच ‘गाऊट’ किंवा ‘संधिरोग’ होय. याची लक्षणे म्हणजे लहान सांध्यांमध्ये म्हणजे बोटाच्या सांध्यांमध्ये सूज, असह्य वेदना व लालसरपणा येतो. यात बरेचदा ताप असतो. तापाचा चढ-उतार बर्‍याच पेशंटमध्ये दिसून येतो. काही वेळेस गाऊटचे दुखणे मोठ्या सांध्यांमध्येही दिसून येते. गाऊटचे दुखणे सांध्यात अचानक सुरू होते आणि रात्रीतून वाढते. याचा परिणाम पायाच्या अंगठ्यावरच्या सांध्यावर जास्त प्रमाणात होतो. या रोगात हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक ऍसिडचे खडे तयार होतात. त्यामुळे या वेदना होतात. पायाची बोटे, हाताची बोटे, हाताची ढोपरे, गुडघ्यात यांच्या त्यांच्या जागेवर असह्य वेदना होऊन तेथील भाग गरम होऊन सुजतो. त्वचा लाल होते. या लक्षणांबरोबर अनेकदा थंडी असते. पण काही रुग्णांना तापाबरोबर सांधे दुखतात तर काहींचे फक्त सांधे दुखतात. त्या ठिकाणी गरम लागते, तेथे सूज आलेली असते. त्या सांध्याजवळील शिरा मोठ्या झालेल्या असतात. सूज आलेल्या ठिकाणी दाबले असता खड्डा पडतो, सुई टोचल्याप्रमाणे, फाडल्याप्रमाणे वेदना होतात. पेशंटला ताप उतरत असताना घाम येतो, मूत्रातून मुत्राम्ल खूप प्रमाणात येते. सांधे वाकडे तिकडे किंवा ताठ होतात, सांध्यातील सूज कमी व्हायला लागली की तेथे खाज येते. अशावेळी पेशंट कोणतीही हालचाल करू शकत नाही
हा अनुवंशिक रोग आहे. हा रोग क्रॉनिक (जुनाट) झाल्यास याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. गाऊट या रोगावर औषधे घेताना पथ्य पाळणेही गरजेचे आहे. याची कारणे अनेक आहेत जसे-

  • अति पौष्टिक अन्न खाणारे त्यामानाने शारीरिक श्रम कमी करणारे बरेचदा अंगाने स्थूल असतात. अशांना गाऊट झालेला दिसून येतो.
  • तसेच थंडीपासून शरीराचे रक्षण करता न आल्यानेही हा रोग होऊ शकतो. * बहुतेक स्त्रियांना बाळंतपणानंतर किंवा मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीच्या वेळी गाऊट झालेला आढळून येतो.
  • अति प्रमाणात मद्यपान करणारे चाळीस किंवा त्यावरील वयाच्या पुरुषांना गाउट झालेला दिसून येतो.

गाउटमध्ये रोगाचे मूळ कारण शोधले जाते. त्यानुसारच योग्य औषध योजना करता येते. गाऊटमधील रोगाचे मुख्य कारण म्हणजे पेशंटच्या रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते. होमिओपॅथिक औषधांनी पेशंटच्या रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पेशंटच्या तीव्र वेदना कमी होऊन पेशंटला गुण येतो.

यासाठी पेशंटने काही पथ्य पाळणे आवश्यक आहे –
काय खाऊ नये – मशरूम, मासे, मांस, मटण, खूप तिखट मसालेदार पदार्थ, तसेच चिकन, अल्कोहोल(मद्यपान), साखर, मिठाया, बेकरीचे पदार्थ शीतपेये, आईस्क्रीम टाळावे. मीठ कमी खावे. आंबट पदार्थ हे पदार्थ शरीरावर प्रतिकूल परिणाम करतात त्यामुळे गाऊटची लक्षणे वाढीस लागतात व मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नाही.

काय खावे – संपूर्ण धान्य, कडधान्य, भाज्या, फळे, सफरचंद, काकडी, डाळी, दूध जरुरीपुरते रोजच्या आहारात असावे. कारण मांसल भागाचे पोषण होणे गरजेचे आहे आणि अडीच ते तीन लिटर पाणी रोज जरूर प्यावे. व्यायाम करावा.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

स्तन कर्करोग जनजागृती

डॉ. मनाली पवार भारतात स्तनाचा कर्करोग सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रियांमधील कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२...

अर्धशिशीवर होमिओपॅथी

डॉ. आरती दिनकर १६ वर्षांचा मुलगा यश. त्याला ‘मायग्रीन’ म्हणजेच अर्धशिशीचा त्रास होता म्हणून तो होमिओपॅथीच्या उपचारांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये...

महती भारतीय संस्कृतीची

योगसाधना - ५२४अंतरंग योग - १०९ डॉ. सीताकांत घाणेकर आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यावेळच्या...

‘दमा’वर होमिओपॅथीच हितकर

डॉ. आरती दिनकरहोमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशकपणजी वारंवार होणारी सर्दी, शौचास साफ नसणे, अपचन, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार, मन:क्षोभ, हवेतील फेरफार,...

‘विद्या विनयेन शोभते’

योगसाधना - ५२३अंतरंग योग - १०८ डॉ. सीताकांत घाणेकर आपले पूर्वज किती थोर होते ज्यांनी...