Home बातम्या खारेबांध येथे ८९ हजारांची चोरी

खारेबांध येथे ८९ हजारांची चोरी

0

मडगावचे प्रसिद्ध हार्डवेअर व इतर सामानांचे व्यापारी व वितरक पंकज पै काकोडे यांच्या खारेबांध येथील दुकानाचे शटर्स वाकवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. काल शनिवारी सकाळी दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. सदर दुकानांतून चोरट्यांनी एलसीडी टीव्ही, लॅपटॉप, तसेच रोख १६ हजार रुपयांचा ऐवज लुटला.

आज सकाळी याबाबत मडगाव पोलीस स्थानकावर चोरीची तक्रार दाखल करून घेण्यात आली. या चोरीप्रकाराबाबत मडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.