दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या पाच संचालकांना कोर्टाने काल दि. २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. परवाच्या आगीत ९१ जण मृत्यूमुखी पडले होते. यातील ८५ रुग्ण आहेत. अटक केलेल्यांची नावे, राधे श्याम गोएंका, प्रशांत गोएंका, मनीष गोएंका, श्रवण कुमार तोडी, रवी तोडी, दयानंद अग्रवाल आणि राधे श्याम अग्रवाल अशी आहेत.
पैकी एस के तोडी आणि आर एस गोएंका हे दोन वेगळ्या उद्योगसमूहांचे चेअरमन आहेत. त्यांनी सरकारशी भागीदारीत हे इस्पितळ सुरू केले होते. परवा पहाटे ३ वा. इस्पितळास आग लागली तेव्हा एकूण १६० जण इस्पितळात होते. संपूर्ण वातानुकूलित आणि सुपर स्पेशालिटी इस्पितळात आग विझविण्याची प्रभावी यंत्रणा नव्हती याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.