Home बातम्या काणकोण नगरपालिका कामगारांची संघटनेकडे तक्रार

काणकोण नगरपालिका कामगारांची संघटनेकडे तक्रार

0

अन्य कामगारांच्या भरतीचा संशय

काणकोण नगरपालिकेच्या दैनंदिन रोजंदारीवरील कामगार आणि कंत्राटी कामगारांना डावलून अन्य कामगारांना कामावर घेऊन कायम करण्याचा डाव पालिका मंडळाने आखला असून कंत्राटी कामगारांनी या प्रकाराला आक्षेप घेऊन अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेकडे या सबंधीची तक्रार केली आहे.

या पालिकेत मागच्या १५ वर्षांपासून काम करणारे २७ कंत्राटी कामगार तर १७ दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. या कामगारांना सरकारतर्फे दैनंदिन रोजंदारीवरील कामगारांना जाहीर केलेले वेतन दिले जात नाही. अन्य कोणतेच भत्ते दिले जात नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. सत्तेवर येणारे प्रत्येक मंडळ आपल्या मर्जीनुसार वागत असून या कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यानी स्थानिक आमदार तथा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. दोन महिन्यांपूर्वी नगर नियोजन मंत्री फ्रान्सिस्क डिसोझा यानी पालिकेला भेट दिल्यावेळी कामगाराना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु पालिका मंडळ त्याची कार्यवाही करीत नसल्याचा कामगारांचा आरोप आहे.