कला-संस्कृती खात्यातर्फे पाच पुस्तकांचे उद्या प्रकाशन

0
233

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे छापण्यात आलेल्या नाट्य, लोककला आणि संगीतविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन येत्या शुक्रवारी दि. २६ रोजी खात्याच्याच संस्कृती भवन सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होईल. कला-संस्कृती सचिव फैजी हाश्मी आणि मुंबई स्थित ज्येष्ठ रंगकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नाईक या सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या उपक्रमांतर्गत खात्याने आजवर अनेक लेखक व प्रकाशकांना सहाय्य केले असून काही पुस्तके स्वत: प्रकाशितही केली आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी खात्यातर्फे छापण्यात आलेल्या ङ्गरुपडींफ (पुनर्मुद्रण- ज. स. सुखटणकर), ङ्गरुपड्यांची रुपकथाफ (पुनर्मुद्रण- ज. स. सुखटणकर), ङ्गलाल शाल जोडी जरतारीफ (पुनर्मुद्रण- के. ना. बर्वे), ङ्गझेम झेम झेमाडोफ (पुष्पावती बाबल केरकर) आणि ङ्गतबला मेड ईझीफ (श्रीधर बर्वे) या पाच पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात येणार आहे. यातील ङ्गरुपडींफ, ङ्गरुपड्‌‌‌यांची रुपकथाफ, ङ्गलाल शाल जोडी जरतारीफ ही तीन पुस्तके नाटक व नाट्यविषयक इतिहासाशी संबंधित आहेत. ङ्गझेम झेम झेमाडोफ या पुस्तकात पारंपारिक गोमंतकीय फुगडी आणि धालोगीते आहेत. तर ङ्गतबला मेड ईझीफ हे पुस्तक इंग्रजी भाषेत असून, तबला वाद्याची माहिती व तबला शिक्षणाचे (ताल) प्राथमिक धडे अगदी साध्या व सोप्या भाषेत मांडले आहेत. प्रकाशनाच्या निमित्ताने त्या दिवशी सर्व पुस्तकांवर विशेष सवलत दिली जाणार आहे.