विनावापर शाळा इमारती समाजोपयोगी कामांसाठी वापरणार

0
97

विनावापर पडून असलेल्या सरकारी शाळांच्या इमारती अंगणवाडी तसेच अनुदान प्राप्त तसेच अन्य संस्थांना सांस्कृतिक शैक्षणिक कारणांसाठी वापरण्यास देण्यासंबंधीच्या प्रस्तावावर पुढील पंधरा वीस दिवसात निर्णय होऊ शकेल, असे शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्या इमारतींचा आता समाजोपयोगी कामांसाठी वापर करण्याचा सरकारने प्रस्ताव पुढे आणला आहे. अनेक संस्थांनी वरील शाळा इमारती मिळविण्यासाठी सरकार दरबारी प्रस्ताव पाठविले आहेत.