Home बातम्या कला अकादमीचे साहित्य पुरस्कार जाहीर

कला अकादमीचे साहित्य पुरस्कार जाहीर

0

कला अकादमीचे २०१० या वर्षासाठीचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून कोकणी (देवनागरी व रोमी लिपी) विभागात रामनाथ ग. गावडे यांच्या ‘तळाचो फातर’ या कादंबरीची तर मराठी विभागात विठ्ठल गावस यांच्या ‘ओझे’ या कथासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार विजेत्याना प्रत्येकी रु. २५,००० रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कला अकादमीच्या वतीने उभय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

कोकणी (देवनागरी व रोमी लिपी) विभागात एकूण २४ साहित्यकृती तसेच मराठी विभागात एकूण १४ साहित्यकृती पुरस्कार निवडीच्या विचारार्थ आल्या होत्या. कोकणी विभागाच्या निवड समितीवर डॉ. चंद्रलेखा डिसोझा, डॉ. जयंती नायक व प्रियदर्शनी तडकोडकर तर मराठी विभागात डॉ. वासुदेव सावंत, नारायण महाले व निलीमा आंगले यानी निवड समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले.

साहित्य पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कला अकादमीने कळविले आहे.