Home बातम्या ‘कदंब’ला स्वावलंबी बनविण्याचे लक्ष्य !

‘कदंब’ला स्वावलंबी बनविण्याचे लक्ष्य !

0

सरकारने महामंडळाला आवश्यक ती आर्थिक मदत देऊन नुकसानीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. महामंडळाकडे असलेल्या मालमत्तेचा योग्य पध्दतीने वापर केल्यास महामंडळ फायद्यात येऊ शकेल, असा विश्‍वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. सध्या बसींची संख्या पाचशेवर गेल्याचे ते म्हणाले. कदंब महामंडळाच्या पास व अन्य योजनांमुळे खाजगी बस मालकांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होऊन नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रशासकीय कर्मचारी व व्यवस्थापक यांनी महामंडळ हे कुटुंब मानून काम केल्यास महामंडळ प्रगतीपथावर पोचण्यास विलंब लागणार नाही, असे सांगितले.

संजय घाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पासधारक प्रवाशांची संख्या लाखभर

महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी आपल्या भाषणात महामंडळाने वर्षभरात २३४ नव्या बसगाड्या घेतल्याचे सांगितले. पुढील वर्षात पेडणे, माशेल व वास्को येथील बसस्थानकाचे बांधकाम सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पास पध्दतीमुळे प्रतिदिनी सुमारे १ लाख प्रवाशी कदंबमधून प्रवास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.