कुठ्ठाळी मतदारसंघातून बिनविरोध निवडल्या गेलेल्या भाजपच्या उमेदवार एलिना साल्ढाणा यांना येत्या ८ जून रोजी मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे. राजभवनवर संध्याकाळी ४ वाजता होणार्या एका सोहळ्यात एलिना साल्ढाणा यांना शपथ देण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
माथानी साल्ढाणा यांचे निधन झाल्याने कुठ्ठाळी मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. भाजपने त्याठिकाणी उमेदवार म्हणून माथानी यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांना रिंगणात उतरविले होते. ऐनवेळी कॉंग्रेसचे उमेदवार रेमंड डिसा तसेच अपक्ष उमेदवार रमाकांत बोरकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एलिना यांची बिनविरोध निवड झाली होती.