पणजी महापालिकेची एक सफाई कामगार संगीता बुदिहाल (सांतइनेज) हिच्या गळ्यातील मंगळसूत्र काल चोरट्यानी हिसकावून नेण्याची घटना कला अकादमीजवळ घडली.
काल दुपारी १२ वा. संगीता बुदिहाल ही कला अकादमीकडून ‘ताज विवांता’ या हॉटेलच्या दिशेने चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी तिचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पणजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलेली असून चोरट्यांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले.