राजस्तानमधील एका अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळणुकीच्या आरोपावरून सध्या जोधपूर येथील तुरुंगात असलेल्या आसाराम बापू यांच्या विरोधात आता अशाच प्रकारची आणखी तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे. तसेच आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साई याच्या विरोधातही अशीच तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सुरत येथील दोन बहिणींनी या तक्रारी नोंदविल्या आहेत. आसाराम व नारायण साई यांनी वरील कथित गुन्हे २००१ ते २००६ या काळात केल्याचेे तक्रारीत म्हटले आहे. पीडित तरुणींपैकी मोठ्या बहिणीने आसाराम विरुध्द व दुसर्या बहिणीने नारायण साई विरोधात तक्रार केली आहे. एक संत म्हणून समाजात आसाराम यांचा दबदबा असल्याने त्याच वेळी तक्रार करण्याचे धाडस झाले नव्हते असे या बहिणींचे म्हणणे आहे. वरील दोघांविरुध्द तक्रारी नोंदविण्यात आल्याची माहिती सूरतचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली.