Home बातम्या आराखडा रद्द करण्याची कॉंग्रेस आमदारांची मागणी

आराखडा रद्द करण्याची कॉंग्रेस आमदारांची मागणी

0

सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव, हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कृतीदलाने बनविलेला हा आराखडा रद्द करावा अशी मागणी केली आहे.

नव्या आराखड्यामुळे काही आमदार-मंत्र्यांना बांधकामविषयी नुकसान सोसावे लागण्याची शक्यता असल्याचे कळते. निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या या मागणीमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पेचात सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रादेशिक आराखड्याबाबत सामाजिक संघटनांकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक आराखडा रद्द करण्याच्या झालेल्या मागणीबाबत विचारले असता त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही असे ते म्हणाले.