Home बातम्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी संयुक्तपणे करणार उमेदवारांची निवड

कॉंग्रेस-राष्ट्रवादी संयुक्तपणे करणार उमेदवारांची निवड

0

आपल्या पक्षाने १२ जागांसाठी केलेला दावा कायम आहे. त्यामुळे बाराही मतदारसंघातील उमेदवारांच्या बाबतीत आढावा घेण्याचे काम चालू असून निवडणुकीनंतर सरकार स्थापन करायचे असल्याने जिंकून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवार निवडण्यावर काल बैठकीत चर्चा झाली.

पुढील १० दिवसांत तिसर्‍या फेरीतील बैठक होणार आहे. काल झालेल्या बैठकीत कॉंग्रेसच्यावतीने गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार, सचिव सुधाकर रेड्डी, मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर, तर राष्ट्रवादीच्या वतीने भारती चव्हाण, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व प्रदेश अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी भाग घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार उपसभापती माविन गुदिन्हो यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांचीही बैठकीत दखल घेतल्याचे कळते. दोन्ही पक्षांची युती होण्यास विशेष अडथळे नसल्याचे भारती चव्हाण यांचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांना युती हवी आहे. त्यामुळेच बैठका सुरू झाल्या आहेत.