Home बातम्या अतिक्रमणविरोधात मडगाव पालिकेची कारवाई

अतिक्रमणविरोधात मडगाव पालिकेची कारवाई

0

मडगाव पालिकेने सोमवारी व काल असे दोन दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करून ५० हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला. बाजार निरीक्षक मोहन आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम चालविली. कोहिनूर हॉटेलच्या बाजूस असलेल्या दुकानदारांनी पदपथावर सामान ठेवले होते.

त्या सामानामुळे पादचार्‍यांना चालणे कठीण बनले होते. काल स्टेशन रोड, पिकअप स्टँड व सडेकर लेनमध्ये कारवाई केली. मुख्याधिकारी दिपाली नाईक यांच्याकडे तक्रीरी गेल्या होत्या. ही मोहीम चालूच राहणार असल्याचे मोहन आर्लेकर यांनी सांगितले.