Home बातम्या ‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’

‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’

0

आपण भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काल नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर केले. सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये भेट घेऊन अडवाणी यांनी आगामी रणनीतीबाबत चर्चा केली व त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला.

‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून जनसंघ आणि भाजपापर्यंत आपण या संघटनेत वावरलो याचा मला आनंद वाटतो. मला पंतप्रधान व्हायचे नाही.’’ असे अडवाणी म्हणाले. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात का असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अडवाणींनी वरील उत्तर दिले. आपल्याला आपल्या पक्षाने आणि पाठिराख्यांनी पंतप्रधान पदाने जे दिले असते त्याहून खूप काही दिले आहे, असेही ते उद्गारले.

आपण आपल्या नियोजित यात्रेसाठी सरसंघचालकांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागपुरात आलो होतो, असे अडवाणी यांनी सांगितले. अडवाणींनी यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.