परवा मध्यरात्री १२.३० वा. सुमारास मुळगाव येथे गोपाळ नाईक चालवित असलेल्या श्यामसुंदर पेडणेकर यांच्या मालकीच्या विद्युत उपकरणे विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला आग लागली. याचवेळी खरपाल येथे आग विझविण्यासाठी डिचोली अग्नीशामक दल गेल्याने म्हापशाहून जवानांना बोलावण्यात आले.
या आगीत दुकानातील दूरदर्शन संच, व्ही.सी.डी, पंखे, मिक्सर, ऍम्प्लीफायर, ट्यूबलाईट्स तसेच दुकानातील अन्य सामान जळाल्याने त्यांना रु. १० लाख ६०० रुपयांची हानी झाली. म्हापसा अग्नीशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने सुमारे २ लाख रु.ची मालमत्ता वाचू शकली. आगीचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, खरपाल येथे दुसर्या आगीच्या घटनेत अमृत गावस यांच्या मालकीच्या हॉटेलला परवा मध्यरात्री आग लागून सुमारे ८० हजार रु.चे नुकसान झाले. हॉटेलमधील बर्याच वस्तू आगीत जळाल्या. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे. डिचाली अग्नीशामक दलाने २ लाख रु.ची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.