Home बातम्या मुरगाव बंदराच्या खासगीकरणास विरोध

मुरगाव बंदराच्या खासगीकरणास विरोध

0

मुरगाव बंदराचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावास मुरगाव बंदराच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या विरोधास अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेसने पाठिंबा व्यक्त केला आहे.

मुरगाव बंदरावर खासगीकरण केल्यास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोका ठरेल, गेली अनेक वर्षे बंदरावरील कामगारांनी प्रामाणिकपणे ट्रस्टच्या विकासाला योगदान दिले आहे. त्याचा केंद्र सरकारने विचार करावा, असे आवाहन आयटक सचिव ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले आहे.