विविध अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेत गुंतलेले सुमारे नऊशे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे कमांडो काढून घेण्यात आले असून त्यांना आता दहशतवादविरोधी मोहिमेसाठी वापरले जाणार आहे. सध्या एनएसजीतर्फे केवळ पंधरा अतिमहनीय व्यक्तींची सुरक्षा पाहिली जात असून इतर सर्व अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेच्या जबाबदारीतून एनएसजीला हटवण्यात आले आहे.
दहशतवादविरोधी कारवाईसाठी खास प्रशिक्षण दिलेले एनएसजी कमांडो राजकारण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १९९२ पासून ते व्हीआयपींच्या सेवेत तैनात होते.