राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सन्मय परांजपे व मल्लिका गोगोई यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेेतेपद प्राप्र केले. अंशुमन अगरवालने दुहेरी किताबाला गवसणी घातली. गोवा टेबल टेनिस संघटनेने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अंशुमनने सब ज्युनियर व ज्युनियर मुलांच्या विभागात बाजी मारली. कॅडेट मुलांच्या व मुलींच्या विभागात अनुक्रमे ऍरोन फारियास व लिओमा फर्नांडिस ही दुकली वरचढ ठरली. सब ज्युनियर मुलीचा किताब नाजिदा शेख हिने पटकावला. ज्युनियर मुलींमध्ये पृथा पर्रीकर तर मिनी कॅडेट मुली व मुलांमध्ये रुची कीर्तनी व रिशान शेख यांनी बाजी मारली.
बक्षीस वितरण समारंभाला भारताची स्टार टेबलटेनिसपटू व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मनिका बत्रा प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. यावेळी तिने आपल्या आवडत्या बॅकहँड स्ट्रोकचे दर्शन घडवून उपस्थितांची वाहवा मिळविली.
सविस्तर निकाल ः मिनी कॅडेट ः मुली ः रुची कीर्तनी वि. वि. अनवी नाडकर्णी ३-० (११-६, ११-९, १४-१२), मुलगे ः रिशान शेख वि. वि. अथर्व धुळापकर ३-० (११-४, ११-४, ११-६), कॅडेट ः मुली ः लिओमा फर्नांडिस वि. वि. गालया फर्नांडिस ३-१ (१३-११, १३-११, १४-१६, ११-५), मुलगे ः ऍरोन फारियास वि. वि. खुशाल नाईक ३-० (११-३, ११-९, ११-७), सब ज्युनियर ः मुलीः नाजिदा शेख वि. वि. आलया अरोरा ३-० (११-७, १४-१२, ११-९), मुलगे ः अंशुमन अगरवाल वि. वि. शांतेश म्हापसेकर ३-० (१२-१०, ११-८, ११-७), ज्युनियर ः मुली ः पृथा पर्रीकर वि. वि. सानिशा शेट्ये ३-२ (३-११, ७-११, १२-१०, ११-५, ११-६), मुलगे ः अंशुमन अगरवाल वि. वि. शांतेश म्हापसेकर ३-१ (११-६, ११-९, ९-११, ११-७), महिला एकेरी ः मल्लिका गोगोई वि. वि पृथा पर्रीकर ३-२ (१३-११, ६-११, ११-९, ३-११, ११-६), पुरुष एकेरी ः सन्मय परांजपे वि. वि. धीरज राय ४-० (११-४, ११-६, ११-७, ११-४)