द. आफ्रिका संघात सहा नवे चेहरे

0
141

इंग्लंडविरुद्ध होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १७ सदस्यीय संघ जाहीर करताना सहा नव्या चेहर्‍यांना स्थान दिले आहे. संघाचे नवीन प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची पुन्हा बांधणी करण्याच्या उद्देशाने निवड समितीने युवा खेळाडूंनी कसोटी संघाची दारे उघडली आहेत. हाशिम आमला व डेल स्टेन यांची निवृत्ती, दुखापतीमुळे लुंगी एन्गिडी व अष्टपैलू वियान मुल्डर यांची अनुपलब्धता तसेच मागील पाचही कसोटींत झालेल्या पराभवामुळे कठोर पावले उचलण्यात आली आहेत. फलंदाज पीटर मलान व रस्सी वेंडर दुसेन, वेगवान गोलंदाज डॅन पॅटरसन, डावखुरा मध्यमगती गोलंदाज ब्युरन हेंड्रिंक्स, अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस व यष्टिरक्षक फलंदाज रुडी सेकंड हे सहा खेळाडू २६ डिसेंबरपासून प्रिटोरिया येथे होणार्‍या कसोटीत पदार्पण करू शकतात.

दक्षिण आफ्रिका संघ ः फाफ ड्युप्लेसी (कर्णधार), तेंबा बवुमा, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, ब्युरन हेंड्रिक्स, केशव महाराज, ऐडन मार्करम, जुबेर हमझा, ऍन्रिक नॉर्के, डॅन पॅटरसन, आंदिले फेहलुकवायो, व्हर्नोन फिलेंडर, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रुडी सेकंड व रस्सी वेंडर दुसेन.