म्हादईप्रश्‍नी आज पेडण्यात मोहीम

0
122

पेेडण्यात आज दि. २६ रोजी म्हादई बचावासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता पेडणे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल. या जनजागृती मोहिमेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पेडणे येथे घेण्यात आलेल्या म्हादई बचाव आंदोलन समितीने पत्रकार परिषदेत केले. यावेळी आपचे प्रसाद शहापूरकर, गोवा सुरक्षा मंचाचे विनायक च्यारी, शरद गावडे, भारत माता की जयचे गजानन मांद्रेकर, जीवनदायिनीचे संस्थापक नारायण सोपटे केरकर, शांतादुर्गा सांस्कृतिक संस्थेचे सतिश धुमाळ, आल्विन मास्कारेन्हस, ज्ञानेश्वर कारापूरकर आदी उपस्थित होते.