म्हादई प्रश्‍न १५ दिवसांत सोडवा

0
132

>> म्हापशातील जनजागृती मोहिमेत मागणी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे राज्य सरकारला खोटी आश्‍वासने देतात आणि हे सरकार त्याला बळी पडत आहे. २०१२ पासून राज्य सरकारने खोटारडेपणाच करून जनतेला रस्त्यावर येण्यासाठी भाग पाडले आहे. म्हादई प्रश्‍न येत्या १५ दिवसांत सुटला नाही तर गोव्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि लोक रस्त्यावर येणार असल्याचा इशारा सुभाष वेलिंगकर यांनी दिला.

म्हापसा येथील हुतात्मा चौकात म्हादई बचाव आंदोलन बार्देश तालुका जागृती अभियानने आयोजित केलेल्या आंदोलनावेळी वेलिंगकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत अरविंद भाटीकर, एल्वीस गोम्स, राजेंद्र घाटे, जितेश कामत, श्रेया धारगळकर, ऑल्टन लोबो, व्हिन्सी व्हेगस, सुदेश तिवरेकर, मायकल डिसोझा, प्रदीप पाडगावकर, हेमंत कोरगावकर, सुनील मेथर, अभय सामंत, संदीप पाळणी, ऐश्‍वर्या साळगावकर तसेच इतर संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नाटक सरकारचे म्हादई वळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तसेच म्हादई जलतंटा आयोगाच्या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हा प्रकल्प रेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात केंद्र सरकारचे कर्नाटकाला झुकते माप मिळत आहे. आणि गोवा सरकार मात्र याबाबतचे पुरेसे गंभीर नाही. यामुळे जीवनदायिनी म्हादईच्या अस्तित्वाचा प्रश्‍न गोव्यातील ४० ते ४५ टक्के जनजीवनावर परिणाम करणारा आहे, असे गोम्स, भाटीकर, प्रदीप पाडगावकर यांनी सांगितले.

धारगळकर यांनी, म्हादईच्या नावाने हे सरकार राजकारण करत आहे. म्हादईसाठी एकही राजकीय नेता सध्या पुढे येत नाही. पण निवडणुकीच्यावेळी लोकांना एकत्र करण्यासाठी रात्रंदिवस झटतात यासाठी हे आंदोलन तीव्र होणे आवश्यक असल्याचे सागितल. यावेळी जितेश कामत, राजन घाटे, ऐश्‍वर्या साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.