Home बातम्या बेकायदा गोहत्येवर कारवाई

बेकायदा गोहत्येवर कारवाई

0

राज्यात यापुढे बेकायदा गोहत्येचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले.

शून्य तासाला आमदार विष्णू वाघ यांनी उपस्थित केलेल्या सदर प्रश्‍नावर बोलताना त्यानी वरील स्पष्टीकरण केले. यापुढे राज्यात कुणालाही बेकायदेशीररित्या तसेच उघड्यावर गोहत्या करता येणार नसल्याचे पर्रीकर म्हणाले. बेकायदेशीररित्या होणारी गोहत्या थांबायला हवी याबाबत कुणाचेही दुमत नसल्याचे पर्रीकर म्हणाले. उघड्यावर गोहत्या केल्यास रोगराई पसरू शकते असे सांगतानाच रोग झालेली गुरेही आणून मांसासाठी मारली जात असल्याचे पर्रीकर म्हणाले. मानवी जीवनासाठी हे घातक असून असले प्रकार थांबायला हवेत, असे ते पुढे म्हणाले. गोहत्या ही केवळ सरकारी मांस प्रकल्पातच व्हायला हवी, असे ते म्हणाले.