रॉय नाईक याचे असली पदार्थ व्यवहारातील दलालांशी संबंध होते की काय याची चौकशी करण्यासाठी मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली.
विष्णू वाघ, लवू मामलेदार व कायतान सिल्वा हे या समितीचे सदस्य असल्याचे पर्रीकर यांनी पुढे सांगितले.
रॉय नाईक याचे अमली पदार्थ दलालांशी संबंध होते की काय याची चौकशी करण्याबरोबरच, पोलिसांचे या दलालांशी संबंध होते काय त्याची चौकशी करण्याबरोबरच अटालाला देशाबाहेर पळून जाण्यास कसे यश आले त्याची चौकशीही समितीला करण्यास सांगितली असल्याचे पर्रीकर म्हणाले.
सदर समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करावा लागणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.