विदर्भातील शेतकर्याच्या आत्महत्या चालूच असून गेल्या चार दिवसात सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. विदर्भातील वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्हातील हे शेतकरी आहेत.
दरम्यान, डिसेंबर २०११ मध्ये सरकारने जाहीर केलेली मदत शेतकर्यांना वेळेत न मिळाल्याने कालपासून घाटंजी येथे धरणे आंदोलन सुरु झाले आहे.
विदर्शभातील चार जिल्ह्यांत राष्ट्रीयकृत बँका मदतीची रक्कम पीक कर्जात जमा करून घेत आहेत त्यामुळे शेतकरी नाराज बनले आहेत. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले असल्याचे कळते.