संशयास्पद स्थितीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह

0
106

सांतइनेज, पणजी येथील टी. बी. इस्पितळाजवळील एका भाड्याच्या खोलीत आसाममधील दांपत्याचे मृतदेह संशयास्पद स्थितीत काल संध्याकाळी आढळून आले आहेत. श्रीमांतो बोरा व रिम्पी बोरा अशी त्यांची नावे आहेत.
येथील पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये पाठविले आहेत. दरम्यान, शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर दांपत्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सांतइनेज येथे एका दांपत्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी रिम्पी बोरा हिचा मृतदेह खाटवर तर पती श्रीमांतो बोरा याचा मृतदेह गळङ्गास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे. त्याचे हात वायरच्या साहाय्याने बांधलेले होते.
बोरा हा एका हॉटेलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. तर त्याची पत्नी एका मॉलमधील दुकानात कामाला होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पणजी पोलीस तपास करीत आहेत.